आरोग्य खाते हे बृ.मुं.म.न.पा. चे एक प्रशासकिय खाते असून मअभेप्र (महाराष्ट्र अन्न भेसळ प्रतिबंध) परवाना आरोग्य, अभियांत्रिकी इ. सारख्या अन्य तांत्रिक सल्लागार खात्यांकडून सल्ला घेवून दिला जातो. हे लक्षात घेता कोणत्याही वस्तूचे उत्पादन, साठा किंवा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी आरोग्य खात्याकडून आस्थापनांनी आवश्यक परवाने घेणे अत्यावश्यक आहे. कोणताही व्यवसाय सुरु करण्याच्या तीन महिन्यांपूर्वी आस्थापनांकडून अर्ज मिळणे आवयक असते.भोजनालय, उपहार गृह, औषधे उत्पादन, वैद्यकिय दुकाने, मसाला, सोडावॉटर पेये, बर्फाचे कारखाने, इ. सहित वस्तू/कोणतेही व्यवसाय या परवाना प्रवर्गाअंतर्गत येतात.
| संमति देणारे प्राधिकारी | वैद्यकीय आरोग्य अधिकारी (आरोग्य खाते) |
| कार्यवाही कालावधी | नुतनीकरण आणि नक्कल प्रत दाखल्याच्या अर्जाकरिता निरंक अर्ज शुल्कासहित योग्य अर्ज सादर करण्याच्या वेळेस प्रमाणपत्र दिले जाते. अन्य सर्व अर्जांकरिता आवश्यक कागदपत्रांसहित योग्य अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून सात दिवस(प्रति छाननी पातळी) |
| अर्ज छाननी पातळी | नुतनीकरण आणि नक्कल प्रत दाख्ल्याकरिता एक पातळी अन्य सर्व अर्जांकरिता दोन पातळया |
लागू असलेले शुल्क
| सक्षम प्राधिका-याने अर्जाची संमति दिल्यानंतर देय अनुसूची शुल्क |
अर्ज कार्यवाहीबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न
*अर्ज लवकरच उपलब्ध होतील. सध्या अर्ज नागरी सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत.
शेवटचे अद्ययावत २८/०१/२०१६