महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणा-या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ पारित करण्यात आला असून तो दि. २८.०४.२०१५ पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिल्या जाणा-या लोकसेवा अधिसूचित करण्यात आल्या असून सेवा पुरविण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी, द्वितीय अपिलीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.