Ganpati Visarjan

पर्यावरण पूरक उत्‍सवाचा एक भाग म्‍हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या सर्व विभांगामध्‍ये कृत्रिम तलावांची निर्मिती करण्‍यात येते. या तलावांना दरवर्षी नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षी कृत्रिम तलावांमध्‍ये ७६ हजारांपेक्षा अधिक मूर्तीचे विसर्जन करण्‍यात आले. यंदादेखील सर्व विभागांमध्‍ये कृत्रिम तलाव तयार करण्‍यात आले असून मुंबईकरांनी गणेशमूर्तीचे विसर्जन हे कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन करण्‍यात येत आहे. पर्यावरण रक्षणाचे हे भान आपल्‍याला निर्माल्‍याबाबत देखील जपायचे आहे. महानगरपालिकेने विसर्जन स्‍थळी निर्माल्‍य कलश उपलब्‍ध करुन दिले आहेत, त्‍यातच निर्माल्‍य टाकायचे आहे. असे करताना प्‍लास्‍टीक पिशव्‍यांचा वापर टाळायचा आहे. या निर्माल्‍यापासून खत तयार करण्‍यात येते. हे खत, मुंबईतील विविध उद्यानांमध्‍ये वापरण्‍यात येते.



View Maps in Full Screen  
 View Menu