पोर्टलवर तक्रार कशी नोंदविता येते?

अर्ज घर/कार्यालय किंवा सायबर कॅफेमधून आमच्या नागरी पोर्टलला भेट दिल्यानंतर कोणत्याही संगणकास इंटरनेट जोडल्यानंतर ऑनलाईन तक्रार नोंदणी अर्ज भरता येतो.

नागरी सुविधा केंद्रात तक्रार कशी नोंदविता येते?

अर्जदाराने तक्रार नोंदणी अर्ज पूर्णतः भरुन नागरी सुविधा केंद्रात सादर करणे आवश्यक आहे. नागरी सुविधा केंद्रातील कर्मचारी संगणक प्रणालीमध्ये तक्रार भरुन तक्रारदारास एक तक्रार क्रमांक देईल.

सादर केलेली तक्रारीची पुढील कार्यवाही कशी असते?

तक्रार पुढील कार्यवाहीकरिता महानगरपालिकेच्या संबंधित अधिका-यांकडे दिली जाते. संबंधित अधिकारी तक्रारीचे निवारण करुन पोर्टलवर तक्रारीचा योग्य स्थिती दिली जाते.

अर्जाची कार्यवाही कशी पाहता येते/ स्थिती कशी तपासता येते?

आपल्या तक्रारीची कार्यवही पाहण्यासाठी असताना आमच्या नागरिक पोर्टलवरील देण्यात आलेल्या “स्थिती तपासा” ऑनलाईन सुविधेचा वापर करा. ही सुविधा वापरताना तक्रार क्रमांक (यास ट्रान्झेक्श्न आयडी असेही महणतात) आवश्यक आहे.