अर्ज कोठे करावा ?

बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या जवळील कोणत्साही नागरी सुविधा केंद्रास (सीएफसी) भेट द्या.

अर्ज कसा करावा ?

अर्जदाराने अर्जाचा नमुना संपर्ण भरून त्यावर आपली स्वाक्षरी करुन आवश्यक त्या कागदपत्रे आणि शुल्कासहित नागरी सुविधा केंद्रात जाऊन सादर करणे आवश्यक आहे.

सादर केलेल्या अर्जाची पुढील कार्यवाही कशी असते ?

पुढील कार्यवाहीमध्ये अर्जाची संबंधित विभागाचे आरोग्य खात्याचे प्रमुख यांच्यामार्फत कार्यवाही केली जाते. ठिकाणाची पाहणी आणि अर्ज संमत झाल्यानंतर अनुसूची शुल्क संकलित केल्यानंतर अर्जदारास परवाना दिला जातो.

अर्जाची कार्यवाही / स्थिती कशी तपासावी ?

जवळील नागरी सुविधा केंद्रास भेट द्या किंवा तुमच्या अर्जाचा तपास लावण्याकरिता ऑनलाईन सुविधेचा वापर करुन नागरी संकेतस्थळावरील “स्थिती तपासा” या लिंकमध्ये जाऊन तपासा. ही सुविधा वापरत असताना अर्ज क्र.(यास ट्रांझेक्शन आय डी देखील म्हणतात.) आवश्यकता असते.