मनपाची 200 हुन अधिक उद्याने आणि पार्क यांनी मुंबईकरांच्याच नव्हे तर पर्यटकांच्या देखील वाढत्या अपेक्षा व गरजा पूर्ण करताना मोठी मजल मारली आहे. अजूनही लांब पल्ला गाठायचा आहे व गाठणारच.
काही सकारात्मक, दक्ष नागरिकांच्या सहभागामुळे व भागीदारीने काय मिळवू शकतो त्याबाबत काही उद्यानांची बोलकी छायाचित्रे नमुन्यादाखल सादर केली आहेत.
आमच्या उद्यानांना अवश्य भेट द्या विश्रांति घ्या, तणावमुक्त व्हा आणि आपल्या प्रियजणांसोबत छान क्षण व्यतीत करा. पण हे सर्व Covid संबंधी नियमांचे पालन करूनच.
स्थानासह (Location ) नकाशा (Maps ) घेऊन येणार आहोत ज्याला "Google Maps" च्या माध्यमातून देखील शोधणे आपल्याला शक्य होईल.