कामकाज चालविणयासाठी, महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात स्थायी समितीची सभा भरेल आणि स्थायी समितीस पुढील शर्तींच्या अधीनतेने, सभांच्या संबंधी आणि महानगरपालिकेच्या हिशेबाचे परिनिरिक्षण करण्यासंबंधी तिला योग्य वाटतील असे विनियम वेळोवळी करमा यतील (कलम 49)-
स्थायी समितीची सभा आठवडयातन एकदा आणि आवश्यक वउटेल अशा इतर वेळी घेण्यत येईल (पोटकलम (अ)) ( प्रत्येक सभेची सूचनेमध्ये दिवस, वेळ आणि ठिकाण आणि महानगरपालिका चिटणीसांनी तयार केलेले (कार्यक्रमपत्रिका व सहपत्र) सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी पाठविणे.)
प्रत्येक स्थायी समितीची पहिली सभा आयुक्त निश्चित करील त्या दिवशी व त्या वेळी घेण्यात येईल आणि त्या दिवशी घेतली गेली नाही तर आयुक्त निश्चित करील अशा नंतरच्या कोण्त्याही दिवशी घेण्यात येईल आणि स्थायी ससमितीची यानंतरची प्रत्ये सभ उक्त समिती वेळोवेळी निर्नारित करील अशा दिवशी आणि अशा वेळी घेण्यात येईल.(पोटकलम (ब)).
आयुक्तांच्या मते जे कोणतेही काम स्थायी समितीच्या पुढील सामन्य सभेपर्यंत लांबणीवर टाकता येणार नसेल असे कामकाज पार पाडण्यासाठी स्थायी समितीचा सभापती आयुक्तने सही केलेल्या लेखी मागणीवरुन चोवीस तासांच्या आत उक्त समितीच्या विशेष सभा बोलाविल (पोटकलम (क)). .
स्थायी समितीच्या सभेत अश सभेच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत किमान सहा सदस्य उपस्थित असल्याखेरीज कोणतेही काम चालविता येणार नाही.(पोटकलम(ड)).
स्थायी समितीच्या प्रत्येक सभेत जर ती सभा घेण्याकरिता नेमलेल्या वेळी सभापती उपस्थित असेल तर सभापती अध्यक्षस्थानी राहील आणि सभापती अनुपस्थित असेल तर उपस्थित असलेल्या सदस्यांमधून सभेने त्या वेळेसाठी सभपाती म्हणून निवडलेला एक सदस्य अध्यक्षस्थानी असेल (पोटकलम(ई)).
प्रत्येक प्रश्नाचा निर्णय स्थायी समितीच्या उपस्थित असलेल्या व त्या प्रश्नावर मतदान करण-या सदस्यांच्या बहुमताने करण्यात येईल आणि समसमान मते पडतील तेव्हा अध्यक्ष-प्राधिका-यास दुसरे किंवा निर्णायक मत देता येईल (पोटकलम (फ)).
स्थायी समितीस वेळोवेळी याबाबत केलेल्या विनिर्दिष्ट ठरावांन्वये अशा प्रत्येक उप-समितीत तीनपेक्षा कमी नसतील इतके तिला योग्य वाटतील असे सदस्य मिळून बनणा-या उप-समित्यांकडे आपले कोणतेही अधिकार किंवा कर्तव्ये प्रत्यायोजित करता येतील. स्थायी समितीने तयार केलेली कोणतीही उप-समिती कोणत्याही वेळी बंद करता येईल किंवा तिच्या रचनेत फेरफार करता येतील (पोटकलम (ग)).
उपसमितीला आपलल्या सभांसाठी सभापती म्हणून निवडून देता येईल आणि जर असा कोणताही सभापती निवडून देण्यात आला नसेल किंवा जर कोणतीही सभा घेण्याकरिता नेमलेल्या वेळी तो उपस्थित नसूल तर उपसमितीचे उपस्थित सदस्य अपल्यापैकी एक सदस्य अशा सभेचा सभापती म्हणून निवडतील (पोटकलम(ह)).
उपसमितीच्या कोण्त्याही सभेतील प्रश्नाचा निर्णय हजर असलेलया सदस्यांच्या बहुमताने करण्यात येईल आणि मते समसमान पडतील तया प्रसंगी सभेच्या सभापतीला दुसरे किंवा निर्णायक मत देता येईल मात्र अशा कोणत्याही सभेत तिच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत उपसमितीच्या सदस्यांपैकी किमान दोन-तृतीयांश सदस्य उपस्थित असल्याखेरीज कोणतेही काम चालविता येणर नाही. (पोटकलम (के)).
आयुक्तांस समितीच्या सभेस उपस्थित राहण्याचा आणि त्यात होणा-या चर्चेत भाग घेण्याचा हक्क असून मात्र त्यास अशा सभेत कोणत्याही प्रस्तावार मतदान करण्याची किंवा तो मोडण्याची मुभा असणार नाही