Back


Project Benefits

  • सागरी किनारी रस्त्यामुळे दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई या प्रवासास लागणारा कालावधी कमी होईल. तसेच, पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस.व्ही.रोड व लिंक रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
  • रोजच्या येण्याजाण्याच्या वेळेची बचत झाल्यामुळे, मुंबईकरांचे जीवनमान सुधारेल.
  • वाहतूक गतीमान झाल्यामुळे मुंबईची आर्थिक प्रगती होऊ शकेल आणि नवीन रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.
  • तसेच सागरी किनारी रस्त्यामुळे ध्वनी प्रदुषण, वायू प्रदुषण कमी होईल आणि इंधन बचत होईल.
  • अतिरिक्त हरित क्षेञामुळे प्रदुषण कमी होण्यास मदत होईल व सदर हरित क्षेञामुळे जीवनमान सुधारेल.
  • सागरी किनारी रस्त्यावर समर्पित बसवाहतूक (BRTS) योजिले असल्याने पश्चिम मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल व सुरक्षित, जलद आणि परवडणारा प्रवास करता येईल.
  • पर्यावरणातील बदलामुळे समुद्र पातळीतील वाढ इ. बाबींचा अभ्यास करुन किना-यावर होणारी धूप कमी होण्यासाठी सागरी तटरक्षक भिंतीची योजना करण्यात आली आहे.
शेवटचे अद्ययावत १२/०३/२०२१