दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई यादी

अफगाण चर्च

अफगाण चर्च
सन 1883 आणि 1843 च्या सिंध आणि अफगाणमधील युध्दात धारातिर्थी पडलेल्या ब्रिटीश जवानांच्या स्मरणार्थ सन 1847 मध्ये बांधले असून त्या चर्चला सेंट जॉन्स चर्च म्हणूनही ओळखले जाते.

गेटवे ऑफ इंडिया

गेटवे ऑफ इंडिया
भारताचे प्रवेशद्वार हे उल्लेखनीय चिरकालीन स्मारक असून त्याचीदेखील जॉर्ज विटेल यांनी रचना केली आहे.
सन 1911 मध्ये जॉर्ज राजे-पाच आणि राणी मेरी यांच्या भारतास भेट दिल्याच्या स्मरणार्थ बांधण्यात आले.
या भागामध्ये एलिफंटा बेट आणि बंदराच्या आसपासच्या अन्य समुद्रकिना-यांवर जाण्याकरिता बोट सेवादेखील आहे. त्याच्या मागील बाजूस सुंदर असे जुने आणि नवीन ताजमहाल हॉटेलची इमारत आहे.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट
पूर्वीचे विज्ञान संस्थेचे कवासजी जहांगीर सभागृहाचे चांगल्या भारतीय समकालीन कला प्रदर्शित करता यावे यासाठी चार मजली प्रदर्शन सभागृहात रुपांतरीत करण्यात आले

प्रीन्स ऑफ वेल्स संग्रहालय

प्रीन्स ऑफ वेल्स संग्रहालय
व्हिक्टोरियन वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेले प्रीन्स ऑफ वेल्स संग्रहालय हे राजे जॉर्ज-पाचवे मुंबई भेटीस आले त्याचया स्मरणार्थ बांधण्यात आले होते. त्याची संकल्पना जॉर्ज विटेट यांनी केली होती आणि ते सन 1923 मध्ये पूर्ण करण्यात आले.

हे भारतातील खरोखरच उत्तम संग्रहालय असून त्यामध्ये भारतातील प्राचीन संस्कृसहित विविध युगातील धनसंग्रह, सत्यकला, रंगीत चित्र आणि शिल्प येथे आहेत.

जहांगीर कला दालन

जहांगीर कला दालन
काळाघोडा येथे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाजवळ स्थित असून हे दालन मुंबईच्या कलाकारांकरिता समकालीन कला दाखविते.

पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून के.के. हेब्बर आणि होमी भाभा यांच्या इच्छेमुळे सर कवासजी जहांगीर यांनी स्थापना केली होती. ही अवाढव्य संस्था भारतीय कलेस पुनरुज्जीवन प्राप्त करून देवू शकते असा या ठिकाणाचा इतिहास.

प-लोरा फाऊंटन

प-लोरा फाऊंटन
प-लोरा फाऊंटन जुन्या चर्चगेटच्या बॉम्बे फोर्टजवळ उभे असून आता तेथे मोठे रस्ते असून त्यास हुतात्मा चौक असे म्हटले जाते.

बाँम्बेचे माजी राज्यपाल सर बार्टले फ्रेर यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आले असून नंतर ग्रीक देवता प-लोराचे नाव देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (व्हिक्टोरिया टर्मिनस)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (व्हिक्टोरिया टर्मिनस)
छ.शि.ट इमारत सुंदरतेचा नमुना असून आज जगामध्ये वास्तुशास्त्रीयदृष्टया एक सुंदर स्थानक म्हणून गणले गेले आहे.

सन 1888 मध्ये ब्रिटीशांनी बांधले असून व्यवस्थित बसविलेली तावदाने आणि भिंतीवरील नक्षीकामासमवेत तिच्या दर्शनी भागावर अत्युत्तम भुषणकला कोरण्यात आली आहे. फ्रेडरिक विल्यम्स स्टीवन्स या वास्तुशास्त्रकाराने या स्थानकाची रचना रु.16.14 लाख इतके शुल्क घेवून केली आणि ही इमारत पूर्ण होण्यास दहा वर्षे लागली.

छ.शि.ट.च्या कळसावर राणी व्हिकटोरियाचा पुतळा असल्यामुळे राणी व्हिक्टारिया राजवटीच्या स्मरणार्थ या स्थानकास ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ असे नाव देण्यात आले

मुंबईमध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडयाकरिता हे फार महत्वाचे स्थानक आहे. हे भारतातील एक सर्वात व्यस्त स्थानक असून येथे मध्य रेल्वेचे मुख्यालयही आहे.

मरीन ड्राईव्ह

मरीन ड्राईव्ह
मरीन ड्राईव्ह हे दक्षिण मुंबईतील किना-यालगत असलेल्या उलटया ‘सी’ आकाराच्या सहा मार्गाच्या कॉक्रीट रस्त्याने 3 कि.मी. इतक्या भागात विस्तारले आहे. नरीमन पॉईट ते मलबार हिल असा जोडणारा मरीन ड्राईव्ह पश्चिम-दक्षिण-पश्चिम बाजूने दलदलीच्या जमीनीवर बांधण्यात आला आहे.

मरीन ड्राईव्हचे (नेताजी सुभाषचंद्र मार्ग म्हणूनही ओळखले जाते) मुख्य आकर्षण म्हणजे पाने असलेली ताडाची झाडे एका ओळीने असल्यामुळे मोहून टाकतात. एका बाजूला सन 1920 आणि 1930 मध्ये बांधलेल्या डेको कलेच्या इमारतींचा नमुना आणि दुसरीकडे अरबी समुद्र यामुळे रस्त्यास वास्तुशिल्पाची जोड येते. मरीन ड्राईव्ह हे मुंबई मॅरेथॉन, लढाऊ विमानांचा हवाई कार्यक्रम यासहित अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. या ठिकाणाला रात्रीच्या रस्त्यावरील दिवे हि-याच्या हाराप्रमाणे दिसतो यामुळे यास ‘क्वीन्स नेकलेस’ म्हणूनही ओळखले जाते.

महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट)

महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट)
महात्मा ज्योतिबा फुले मंडई किंवा क्रॉफर्ड मार्केट हे नाव बाँम्बेचे पहिले आयुक्त आर्थर कॉफर्ड यांच्या नावावर ठेवण्यात आले.

शहराच्या उत्तरेकडील शेवटच्या जुन्या ब्रिटीश भागात स्थित असलेले मंडई त्याच्या उंच घड्याळ टॉवर आणि घुमटाने क्षितिजालाही घाबरविते. ही मंडई 1869 मध्ये पूर्ण झाली आणि सर कवासजी जहांगीर यांनी या शहरास ही भेट दिली. लॉकवुड किपलींग यांनी बाहेरील भिंत आणि दगडांचे कारंजे यांची रचना केली होती.

क्रॉफर्ड मार्केट हे 1996 पर्यंत घाऊक व्यापारी नगवीन मुंबई येथे जाईपर्यंत बाँम्बेमधील फळांचे मुख्य घाऊक बाजारपेठ होते.

तारापोरवाला मत्सालय

तारापोरवाला मत्सालय
तारापोरवाला मत्सालय हे शहरातील एकमेव मत्सालय आहे. सन 1951 मध्ये बांधकाम झालेल्या या वास्तुस एकूण रु. 8,00,000/- इतका खर्च आला. यामध्ये समुद्र आणि तलावातील पाण्यातील मासे पहावयास मिळतात. हे मत्सालय प्रसिध्द मरीन ड्राईव्ह येथे स्थित आहे. येथे लक्षद्वीप बेटामधून आणलेले सात प्रकारचे प्रवाळ माशांसहित समुद्र आणि गोडया पाण्याच्या माशांच्या 100 प्रजाती आहेत. येथील आकर्षणामध्ये शार्क, कासव आणि मो-या यांचा समावेश आहे.

चौपाटी समुद्रकिनारा

चौपाटी समुद्रकिनारा
मुंबईचे नागरिक आणि पर्यटक येथे वारंवार जात असल्यामुळे कदाचित चौपाटी समुद्रकिनार हा मुंबई शहरातील सर्वात प्रसिध्द समुद्रकिनारा आहे.मलबार टेकडीच्या पायथ्याशी तसेच मरीन ड्राईव्हचा शेवट या ठिकाणी स्थित असलेला हा समुद्रकिनारा मध्य मुंबईतील एकमेव समुद्रकिनारा आहे.तरुण जोडप्यांसून कुटुंबापर्यंत मजा लुटण्यासाठी येतात तसेच आपली सायंकाळची वेळ घालविण्यासाठी वरिष्ठ नागरिक येत असतात तसेच या चौपाटीवर शुध्द हवेमध्ये श्वास घेण्यासाठी येथे येणे प्रत्येकाला आवडते.

मलबार टेकडी

मलबार टेकडी
मलबार टेकडी, अतिशय लहान टेकडीवर वाळकेश्वर मंदिर असून त्यांचे संस्थापक राजे सिलहारा होते. पोर्तुगीजांनी मंदिर उध्वस्त केले होते परंतु रामा कामत यांनी 1715 मध्ये ते पुन्हा बांधले. 50 मीटर(80 फूट) उंच मुंबईतील सर्वात उंच ठिकाण आहे.

मलबार टेकडी हे शहरातील जास्त गर्दीचा निवासी भाग असून उद्योग जगतातील आणि करमणूक क्षेत्रातील मोठया व्यक्तींची येथे निवासस्थाने आहेत.

राजभवन (राज्यपालांचे निवासस्थान) आणि वर्षा बंगला, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकृत निवासस्थानही येथे आहे.

मणी भवन

मणी भवन
साधं आणि सुंदर संग्रहालय, महात्मा गांधीनी 1917 ते 1934 मुंबईस भेट दिली त्यावेळेस गांधीजी येथे राहत असत. मणीभवन येथे गांधीजींची खोली आणि ते वापरत असलेल्या वस्तुंसहित पुस्तके प्रदर्शनासाठी ठेवल्या असून हे संग्रहालय लेबरनम मार्ग, ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ स्थित आहे.

सदर इमारत रविशंकर जगजीवन झवेरी आणि मणी कुटुंबाची होती जे योगायोगाने गांधींजींचे मित्र होते आणि मुंबईतील हया कालावधीमध्ये त्यांचा पाहुणचार करीत असत.

मणीभवनमधूनच गांधीजींनी असहकार,सत्याग्रह,स्वदेशी,खादी आणि खिलाफत चळवळींचा प्रारंभ केला होता.

सदर इमारत रविशंकर जगजीवन झवेरी आणि मणी कुटुंबाची होती जे योगायोगाने गांधींजींचे मित्र होते आणि मुंबईतील हया कालावधीमध्ये त्यांचा पाहुणचार करीत असत. मणीभवनमधूनच गांधीजींनी असहकार,सत्याग्रह,स्वदेशी,खादी आणि खिलाफत चळवळींचा प्रारंभ केला होता.

सदर इमारत 1955 मध्ये गांधी स्मारक निधीने गांधींजींचे स्मारक म्हणून परिरक्षणाकरिता ताब्यात घेतली होती.

एलिफंटा लेणी

एलिफंटा लेणी
एलिफंटा लेणी मुबईमधील मुंबईच्या दुस-या किना-यावर वसलेली आहे. 1987 मध्ये युनेस्को जागतिक पुरातन वास्तु ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले. या ठिकाणी असंख्य स्थानिक आणि परकीय पर्यटक भेट देत असतात. पोर्तुगीजांनी या लेणीस घारापुरी ऐवजी एलिफंटा असे आधुनिक नाव दिले. एलिफंटातील त्रिमुर्ती शंकराचे तीन तोड ब्रम्ह, विष्णू आणि महेशाचे दर्शन घडविते. येथे अन्य शिल्प नटराज आणि सदाशिव यांच्या उठावांचे आणि अर्धनारीश्वराच्या भव्य नक्षीकामाचे दर्शन घडविते.

महालक्ष्मी मंदिर

महालक्ष्मी मंदिर
भुलाभाई देसाई मार्गावर स्थित असलेले हे मुंबईतील सर्वात प्रसिध्द मंदिर संपत्तीची देवता महालक्ष्मीकरिता बांधले आहे. साधारण 1785 बांधलेले ह्या मंदिराचा इतिहास हॉर्नबाय वेलार्डच्या इमारतीशी संबंधित असण्याची शक्यता आहे. समुद्राच्या पाण्यापासून बचाव होण्यासाठी वेलार्डची भिंत बांधत असताना दोन वेळा भिंतीचा काही भाग कोसळला त्यावेळेस प्रमुख अभियंता पाठारे प्रभु यांना वरळीजवळील समुद्रामध्ये लक्ष्मीची मुर्तीचे स्वप्न पडले. शोध घेवून सापडल्यानंतर त्यांनी हे मंदिर बांधले. त्यानंतर वेलार्डचे काम कोणतीही अडचण न येता पूर्ण करता येवू शकले.

हाजी अली

हाजी अली
हाजी अली दर्गा वरळी भागाच्या मध्यभागी असून हे पवित्र स्थान मुस्लीमांचे संत जे मक्का येथे यात्रेस जात असताना मृत्युमुखी पडले त्यांच्या आठवणीस्मरणार्थ आहे. एक श्रध्दा अशी आहे की दागिन्यांचा लहान डबा तरंगत होता आणि तो या समुद्रामधील दगडांच्या बिछान्यावर आराम करण्यासाठी जेथे आला तेथेच किना-यापासून 500 वार लहान दगडी बेटावर भाविकांनी दर्गा बांधली. शहराच्या महालक्ष्मीच्या सीमेस अरुंद दगडी बांधाने हे बेट जोडते. हा दगडी मर्गास कुंपण नसून भरती असताना समुद्राच्या पाणी या बाधावर आपटते. म्हणून दर्ग्यामध्ये फक्त ओहोटी असेल तेव्हाच जाता येते. या दगडी मार्गावर चालताना दोन्ही बाजूने समुद्र हा सहलीच्या यात्रेचा विलोभणीय क्षण आहे.

मुंबईतील प्राणीसंग्रहालय

मुंबईतील प्राणीसंग्रहालय
प्राणीसंग्रहालय आणि उद्यान मुंबईच्या मध्यभागी भायखळा येथे स्थित असून त्यास राणी जिजाबाई उद्यान किंवा राणीबाग म्हणून ओळखले जाते. मुलतः व्हिक्टारिया उद्यान म्हणून संबोधले जाणारे सन 1861 मध्ये बनविले गेले होते. उद्यानामध्ये व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयही स्थित असून औद्योगिक आणि शेतीच्या उद्देशाकरिता बनविले होते.
Master Plan of the Zoo

नेहरु तारांगण

नेहरु तारांगण
लंबवर्तुळाकार नेहरु केंद्राची उंच कणसाच्या बुरखुंडासारखी दिसणारी इमारत महालक्ष्मीच्या उत्तरेकडे दिसते. येथे तारांगणात प्रचार केंद्र आणि संगीत जलसा-नि-चित्रपट सभागृह आहे. हे तारांगण पृथ्वीवरुन कोणत्याही ठिकाणाहून भूत, वर्तमान वा भविष्यामधील कोणत्याही वेळी आकाशाचे प्रतिबिंब दर्शविते.

नेहरु शास्त्रीय केंद्र

नेहरु शास्त्रीय केंद्र
नेहरु शास्त्रीय केंद्र हे साठच्या दशकामध्ये प्रथम शास्त्रीय व तंत्रज्ञान संग्रहालय म्हणून नावारुपास आले त्यानंतर 8 एकरवर पसरलेल्या शास्त्रीय पार्क जीवनाच्या मालमत्तांसंबंधीत, रेल्वे इंजिन, ट्रामगाडया, अतिजलद विमान आणि वाफेवरील लॉरी यासारख्या गोष्टींचे प्रदर्शन समाविष्ट असलेले भारतातील सर्वात मोठे क्रीयाशील शास्त्रीय केंद्र आहे.

सिध्दीविनायक मंदिर

सिध्दीविनायक मंदिर
प्रभादेवी येथे स्थित असलेले हे गणपती देवाच्या स्मरणार्थ प्रमुख मंदिर असून 200 वर्षापूर्वीच्या जुन्या मंदिराच्या जागेवर पुनर्बांधणी करण्यात आली आहे. काळया दगडाने बांधलेल्या या मंदिरात गणपतीच्या दोन मूर्त्या असून अर्धा फूट उंच आणि दोन फूट रुंद आहे.

या मूर्तीचे अपूर्व वैशिष्टये असे की त्याची सोंड जव्या बाजूस वळली असून गणपतीच्या मूर्तीमध्ये सहसा आढळत नाही. दर्शन व पूजेचा महत्वाचा वार मंगळवार असतो परंतु या मंदिरामध्ये दरदिवशी हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात.

चैत्यभूमी

चैत्यभूमी
चैत्यभूमी ही दादर,मुंबई येथे असून राष्ट्रपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ बनविली आहे. दर वर्षी 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल या दिवशी देशभरातून हजारो लोक या भारतीय घटनेच्या शिल्पकारास आदरांजली वाहण्यास येत असतात. .

जुहू किनारा

जुहू किनारा
हा उपनगरीय समुद्रकिनारा मुंबईकरांचा सर्वात आवडता किनारा असून प्रत्येकास बरेच काही देते. मरीन ड्राइव्ह चौपाटीसारखेच जुहू चौपाटी येथे अनेक अन्नपदार्थांचे स्टॉल्स आहेत. हे ठिकाण लहान मुलांना आणण्यासाठी सुंदर आहे जेथे करमणूक उद्यान, खेळाचे मैदान आणि खुले उपहारगृह याची दुहेरी पर्वणी आहे. या किना-यात अपूर्व नजारा असा की येथे उंटावरील सफारी करावयास मिळते जे मजेदार आणि प्रसिध्द आहे.
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६