जगभरातील चांगले खाद्यपदार्थ मुंबईमध्ये खावयास मिळतात. संस्कृतीच्या प्रतवारीचे प्रतिबिंब पाहता खरे तर भारताच्या प्रत्येक भागातील अनेक स्थानिक उच्च विशेषता असलेल्या खाद्यपदार्थांची मजा येथील उपहारगृहांमध्ये घेत असतात.

मुंबईमध्ये उत्तम पंचतारांकीत हॉटेलमध्ये मिळणारे, जलद तयार होणारे खाद्यपदार्थ सर्व लोकांना उपलब्ध आहेत. मुंबई ही ‘विषमतेमध्ये एकता’ या भारताच्या घोषवाक्याप्रमाणे आहे.

मुंबईतील उपहारगृहे विविध प्रकारच्या थाळी देतात. त्यामध्ये पारंपारिक महाराष्ट्रीयन, अस्सल राजस्थानी, गुजराती, आणि मोघलाई थाळीचा समावेश आहे. येथे काही उपहारगृहे पार्शियन खाद्यपदार्थही देतात. यामध्ये दक्षिण भारतीय उपहारगृहे सर्वांची आवडती असून येथे दक्षिण भारतामधील डोसा, इडली, वडा ही खाद्यपदार्थ तुमची रुची अधिक खात्रीने खुलवतात.

बेटारील शहर म्हणून प्रसिध्द असलेली मुंबई युरोपीयन जसे की चायनीज, इटालियन, थाई आणि मेक्सीकन इ. अन्न खाद्यपदार्थसुध्दा पुरविते.

महत्वाचा भारतीय बर्गर किंवा वडा पाव

महत्वाचा भारतीय बर्गर किंवा वडा पाव
रस्त्यावरील कामगारापासून श्रीमंत मुंबईकरापर्यंत तिखट आणि मुठीमध्ये मावणारा वडापाव सर्व मुंबईकरांना आवडतो. महत्वाचा भारतीय बर्गर म्हणून प्रसिध्द असलेला पदार्थ ग्रामीण महाराष्ट्रात वडापाव या नावाने ओळखला जातो. हा बटाटा आणि पावापासून बनविलेला पदार्थ बहुसंख्य मुंबईतील नागरिकांची प्रसिध्द न्याहारी आहे. तसेच सकाळच्या वेळेतील आवडते खाद्य देखील आहे. शहराच्या प्रत्येक नाक्यावर आणि चौकावर उपलब्ध होणारा हा वडापाव दादर रेल्वे स्थानकाबाहेरील खाद्यपदार्थ विक्रेता अशोक वैद्य यांनी प्रयोग म्हणून तयार केला. कर्जत रेल्वे स्थानक सर्व देशभरातील प्रवाशांना प्रसिध्द वडापाव प्लॅटफॉर्मवर व्यापा-यांच्या सहाय्याने उपलब्ध करुन देण्यात प्रख्यात आहे

भेळ पुरी

भेळ पुरी
मुंबईच्या समुद्र किना-यांवर प्रसिध्द असणारे खाद्य म्हणजे भेळपुरी. कुरमुरे, शेव, त्यावर बेसनची तळलेली पुरी यापासुन बनविलेली भेळपुरी, आंबट आणि तिखट असते.

पाव भाजी

पाव भाजी
पाव भाजी ही भारतीयांचे प्रसिध्द खाद्य असून ही मूलतः मुंबईची आहे. पाव म्हणजे रोटी, भाजी म्हणजे कडी आणि भाज्यांचा संयोग.
ज्यावेळेस मुंबईमध्ये गिरणी व्यवसाय जोरात होता त्यावेळेस मुलतः मुंबईतील एक कापडाच्या मिलमध्ये ही थाळी बनविली जात होती. एक स्वस्त थाळी जी प्रत्येकाच्या आवडीची आणि कमी किंमतीची तसेच शहरातील सर्व ठिकाणी उपलब्ध असणारी म्हणुन प्रसिध्द आहे.

श्रीखंड

श्रीखंड
श्रीखंड हे दह्यापासून बनविलेले एक गोड खाद्यपदार्थ आहे. पश्चिम भारतामध्ये अत्यंत प्रसिध्द असलेले हे श्रीखंड गुजराती आणि महाराष्ट्रीयन खानपानामध्ये एक महत्वाचा गोड पदार्थ आहे.

वरण भात

वरण भात
तांदुळाच्या उकडलेल्या भातावर साधी डाळ (वरण) वाढली जाते त्यास वरण भात म्हणुन ओळखले जाते. त्यावर साजूक तुपाचे थेंब आणि बाजूला थोडेसे मीठ व लिंबू, असे हे साधे, चवदार महाराष्ट्रीयन जेवण तुमच्यासाठी मुंबईमध्ये उपलब्ध असते.

मुंबईमधील उपहारगृहांवरील माहितीकरिता येथे क्लिक करा.