बॉम्बे हाऊस भारतातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग असून येथे हिंदीमध्ये चित्रपट तयार केले जातात. हे चित्रपट दूरचित्रवाणी चॅनल्सना एकप्रकारचे खाद्यच पुरवितात. येथे चित्रपटांच्या, सिनेतारकांच्या आणि संगीताच्या आधारावर दूरदर्शन कार्यक्रम बनविणारे स्वतंत्र निर्माते मोठया प्रमाणावर आहेत. बहुसंख्य मासिकांमधुन सिनेतारकांच्या खाजगी जीवनावरील माहिती चाहत्यांना पुरविली जाते.
मुंबईमध्ये मोठया प्रमाणावर असलेल्या चित्रपटगृहामध्ये चित्रपट दाखविले जातात. अन्य भारतीय भाषेतील चित्रपटांमध्ये फक्त मराठी चित्रपट मुंबईच्या चित्रपटगृहामध्ये जास्त दिवस चालतात. काही लहान चित्रपटगृहांमध्ये केवळ इंग्रजी भाषेतील चित्रपट दाखविले जातात.
जागतिक भाषेचे चित्रपट येथे क्वचितच दाखविले जातात. काही चित्रपट क्लब असून तेथे जगभरातील चित्रपट नियमित दाखविले जातात. काही देशाचे राजदूत त्यांच्या देशातील चित्रपटांचे कार्यक्रम येथे कधीतरी आयोजित करतात. जगभरातील अलिकडेच प्रदर्शित झालेले चित्रपट काही चित्रपट उत्सवामध्ये दाखविले जातात.
मुंबई हे भारताचे हिंदी चित्रपट उद्योगाचे मोठे केंद्र आहे. जरी निर्मिती साधनांमध्ये घट होत असली तरी आता वर्षाला जवळजवळ 120 चित्रपटांची निर्मिती होत असते. शहराशी जोडलेल्या या चित्रपटसृष्टीला स्वप्नांची खाण म्हणून राष्ट्रात महत्वाचे स्थान आहे.
स्थानिक चित्रपट उद्योग हा बॉलीवुड या नावाने ओळखला जात असून त्यामध्ये निर्माण होणा-या चित्रपटांचा कल हा नेत्रदिपक, मनोरंजनपुरक कल्पनांकडे असतो ज्यास ´मसाला चित्रपट´ म्हणून ओळखले जाते. कारण ते अभिनय, हाणामारी, संगीत, नृत्य, प्रेम अशा सर्वांचे एकत्रीकरण करुन सुंदर कलाकृती व बोध देणारा चित्रपट तयार करतात. बॉलीवुड चित्रपट विपुल, देखावा-सूचित करणारे करमणूकीचे साधन म्हणून ओळखले जातात आणि चित्रपटाचे यश हे कलाकार, चित्रपट प्रसिध्दी, पार्श्वगायक यांच्यावर अवलंबुन असते.
फेम सिनेमा आयनॉक्स सिनेमा Film Industry in Mumbai