बाजार खाते हे बृ.मुं.म.न.पा.चे एक असे प्रशासकिय खाते आहे ज्यांवर महानगरपालिकेने स्थापित आणि विकसित केलेल्या मंडयांच्या कार्यपदध्तीवर अधिक्षण व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असते. त्याशिवाय बाह्य मटणाची दुकाने आणि शीतगृहे साठे याच्या कार्यपध्दतीवर तसेच निर्यात,प्राण्यांची/कोंबडयाची कत्तल आणि जकात चुकवून आणलेल्या मटणाची विक्री यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. हे खाते विद्यमान मंडयांचा विकास करण्यासंबंधातील सर्व प्रस्ताव, प्रस्तावित बाह्य मटण दुकाने, वस्तु इ. च्या पुनर्वाटप/ हस्तांतरण/बदल ही सर्व कामे पाहतात आणि गाळयांचे आकार, अनुज्ञापन शुल्क, नोकरनामा शुल्क इ. च्या वसुलीचे काम पाहतात.

1. मासिक गाळे/भाडे अधिदान जोडपत्र
2. परवाने रद्द करण्याकरिता अर्ज जोडपत्र
3. परवान्याची नक्कल प्रत मिळण्याकरिता अर्ज जोडपत्र
4. परवाने नुतनीकरण करण्याकरिता अर्ज जोडपत्र

संमति देणारे प्राधिकारी सहाय्यक आयुक्त/महानगरपालिका उपायुक्त, बाजार
कार्यवाही कालावधी नक्कल प्रत दाखल्याच्या अर्जाकरिता निरंक अर्ज शुल्कासहित योग्य अर्ज सादर करण्याच्या वेळेस प्रमाणपत्र दिले जाते.
अन्य सर्व अर्जांकरिता आवश्यक कागदपत्रांसहित योग्य अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून सात दिवस(प्रति छाननी पातळी)
अर्ज छाननी पातळीनुतनीकरण आणि नक्कल प्रत दाखल्याकरिता एक पातळी
अन्य सर्व अर्जांकरिता दोन पातळया

लागू असलेले शुल्क
सक्षम प्राधिका-याने अर्जाची संमति दिल्यानंतर देय अनुसूची शुल्क

अर्ज कार्यवाहीबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न *अर्ज लवकरच उपलब्ध होतील. सध्या अर्ज नागरी सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत.
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६