करमणूक

इंग्रजी भाषेतील दैनिक वार्तापत्र मिड डे मध्ये “द लिस्ट”, या सदराखाली मुंबईतील करमणुकीची एकत्रित माहिती दिली जाते. बातमीपत्र मुख्य प्रवाहातील घटना आणि चित्रपटाविषयी माहिती देतात.

सहल व्यवस्थापन

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ शहर सहलीचे आयोजन करीत असून दररोज दुपारी 2 वाजता आणि उपनगरीय सहली सकाळी 9.15 पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत आयोजन करते. त्यांच्या एका तासाच्या सहलीमध्ये शहरातील प्रकाशमय पुरातन इमारती पाहण्यासाठी छतविरहीत बसगाडी पुरविली जाते. तुम्हाला स्वतःच मुंबई पाहावयाची असल्यास भारत सरकार पर्यटन कार्यालय बहुभाषी मार्गदर्शकाची व्यवस्था करते.

संगीत, नृत्य आणि रंगभूमी

दि नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) हे नरीमन पॉईटच्या टोकावर असून मुंबईचे संगीत, रंगभूमी आणि नृत्याचे केंद्रस्थान आहे. यामध्ये टाटा रंगभूमीचा समावेश असून प्रायोगिक रंगभूमीचे कलाकार काळाघोडा येथे नोव्हेंबर पासून जानेवारीपर्यंत जत्रेच्या कालावधीमध्ये के दुभाष मार्गावर प्रत्येक रविवारच्या सायंकाळी आपली कला सादर करतात.

क्रिकेट

क्रिकेटचा हंगाम ऑक्टोबर पासून एप्रिलपर्यंत असतो. पाच दिवसीय आणि एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने मरीन ड्राईव्ह शेजारी असलेल्या वानखेडे स्टेडियम येथे खेळले जातात.

घोडयांच्या शर्यती

मुंबईच्या घोडयांच्या शर्यतीचा हंगाम नोव्हेंबर पासून एप्रिलपर्यंत असतो. शर्यती महालक्ष्मी रेसकोर्स येथे रविवार आणि गुरुवार दुपारी घेतल्या जातात.

खरेदी

मुंबई हे भारतातील काही चांगल्या बाजार ठिकाणांपेक्षा सर्वात चांगले बाजाराचे ठिकाण आहे. क्राफर्ड मार्केट (फळ आणि भाज्या), मंगलदास मार्केट (सिल्क आणि कापड), झवेरी बाजार (अलंकार), भुलेश्वर मार्केट (फळ आणि भाज्या) आणि चोर बाजार (पुरातन वस्तुंकरिता चोरांचा बाजार)