मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र असून देशाचे आर्थिक बलस्थान तसेच हिंदी चित्रपटसृष्टीचे हृदय आहे आणि कापड उद्योगापासून रसायनांपर्यत सर्व उद्योगांचे मुख्य स्थान आहे
मुंबईचे वैशिष्टय़ म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीची झळाळी, हिरव्यागार गवती मैदानांवरील क्रिकेटचे सामने, समुद्र चौपाटीवरील भेळपुरी, अद्भुत वसाहती वास्तुशिल्प आणि दुमजली लाल बसेस होय.
जिच्या आठवणींमध्ये कधीही हरवून जावं, असं हे सुवर्णस्मृतिचं शहर..
बेटावरील शहर
कोळी मच्छीमार
मुंबई ही पूर्वाश्रमीची बॉम्बे. हे विशाल बंदर आणि महानगर तीन शतकांहून अधिकच्या कालावधीत सात लहान व दलदलीच्या बंदरांपासून विशाल समुहात रुपांतरित झाले. अजुनही दरवर्षी आपल्या भविष्याच्या शोधात येथे हजारो स्थलांतरित येतात. हे बंदर, ज्यावर कोळी मासेमारी मुळात वास्तव्य करुन होते, ख्रिस्तपूर्व कालावधीपासून कित्येक शतके होते तसेच राहीले. त्यानंतर अलीकडच्या काही शतकांमध्ये बंदराभोवतीच्या जमिनीवर महत्त्वाच्या नगरवसाहती आणि बंदराचा विकास झाला. कित्येक हिंदू आणि मुस्लीम राजघराण्यांच्या राजवटीत या शहराने काही प्रमाणात विकास अनुभवला, परंतु पोर्तुगिजांनी गुजरातच्या मुस्लीम शासकांकडून १५३४ मध्ये ताबा घेतल्यावर या बंदराची भौतिक वाढ घडून आली.
आंदण
ब्रागांझा च्या कॅथरीन
राजे चार्ल्स-दुसरा
सन १६६१ मध्ये, इंग्लंडचे राजे चार्ल्स - दुसरा यांनी पोर्तुगीज राणी इंन्फंटा कॅथरीन डी ब्रॅगांझा हिच्यासोबत विवाह केल्याबद्दल, विवाहाचे आंदण म्हणून हे बेट राजे चार्ल्स यांना पोर्तुगीजांनी भेट स्वरुपात दिले.
ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने राजसत्तेकडून हे बंदर भाडेपट्टीने घेतले होते. कारण पूर्व किनारपट्टीवर सात बेटांपैकी सर्वात मोठे संरक्षित असलेले बंदर आणि पश्चिमेस नैसर्गिक सागर यामुळे या बंदराची क्षमता त्यांनी ओळखली होती. या बंदरावर संपन्न व्यापार केंद्र आणि बंदर विकसित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कंपनीने सर्वप्रथम येथे राजवाडा आणि किल्ला बांधला. सततच्या वाढत्या लोकसंख्येला जागा उपलब्ध करुन देता यावी म्हणून, सात बंदरांना आपसांत जोडण्याकरीता भराव टाकण्याचे अनेक प्रकल्प नंतरच्या शतकांमध्ये राबविण्यात आले.
१९ व्या शतकाच्या मध्यान्ही, अनेक उद्योग उभारले गेले, यामध्ये सर्वात महत्त्वाच्या कापड गिरण्या समाविष्ट होत्या. यानंतर मुख्यत्वे रेल्वे, बंदरे आणि गिरण्या यांमध्ये रोजगाराच्या शोधात येणाऱया स्थलांतरीतांची संख्या सतत झपाटय़ाने वाढत राहीली.
व्यावसययिक भरभराट. बॉम्बेची पुनर्रचना. आणि अधिक. (मुंबईची व्यावसययिक भरभराट व पुनर्रचना)
बार्टल फ्रेर
सन १८६१ मध्ये, अमेरिकन यादवी युद्ध सुरु झाले आणि त्याचा परिणाम म्हणजे अमेरिकेच्या दक्षिण राज्यातील बंदरांचा कोंडमारा झाला; त्या देशामधून इंग्लंडमधील लँकेशायर मिलला कापसाचा कच्चा माल मिळविणे अशक्य झाले. त्या मिलला भारतातील पश्चिम आणि मध्य भागातील मुंबई बाजारातून कापूस विकत घेण्यास भाग पडले आणि पाच वर्षाच्या युद्ध कालावधीमध्ये, असा अंदाज होता की, शहरामध्ये ८१ दशलक्ष पौंडहून जास्त चलनी नाणी आली. याचा परिणाम म्हणजे फक्त व्यावसायिक भरभराटीचा चमत्कारच नाही तर कंपनीच्या रोख्यांमध्येसुद्धा भाव वाढ झाली अणि जी प्राथमिकपणे अमर्याद सुधारणा योजना स्थापण्याकरिता झाली होती. सन १८६४ पर्यंत येथे ३१ बँका, १६ आर्थिक सहाय्य संघटना, ८ जमिनीच्या कंपन्या, १६ प्रेस कंपन्या, १० जहाज कंपन्या, २० आयुर्विमा कंपन्या तर १८५५ मध्ये १० कंपन्या होत्या आणि संयुक्त स्टॉक कंपन्या अस्तित्वात नव्हत्या.
दुर्दैवाने, सन १८६५ मध्ये अमेरिकन यादवी युध्दाच्या समाप्तीमुळे, बॉम्बेतील व्यावसायिक भरभराट कोसळली आणि अनेक कंपन्या डबघाईस गेल्या. भरभराटीच्या मध्यान्ही सन १८६२ ते १८६७ पर्यंत मुंबईचे राज्यपाल, सर बार्टल फ्रेर, यांनी किल्ल्याची भिंत तोडून शहराची पुनर्रचना करण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला. किल्ल्याचा तट, दरवाजे आणि खंदक संपूर्णतः काढून टाकण्यात आले आणि किल्ल्याच्या भागामध्ये भव्य गॉथिक सजावट असलेल्या इमारती बांधून मोकळ्या जागेवर नवीन शहर उदयास आले. १९ व्या शतकाच्या अखेरपर्यत, मुंबई भारताचे प्रमुख शहर बनले आणि देशाचे महत्वाचे, व्यावसायिक, आर्थिक, व्यापारी आणि औद्योगिक केंद्र आणि बंदर बनले. सन १८९० मध्ये मोठय़ा प्रमाणावर प्लेग या साथीचा परिणाम म्हणून शहरात बहुसंख्य सुधारणा करण्यात आल्या. सन १९३० मध्ये, जेव्हा सर्व उपलब्ध भूभागावर बांधकाम झाल्यानंतर बहुसंख्य औद्योगिक आस्थापने उभारले गेले, जमिनीवरील ताण वाढत गेला आणि इमारत बांधकाम उच्च टोकावर पोहोचले.
मुंबई आणि स्वातंत्र्य चळवळ
स्वातंत्र्य चळवळीने मुंबईय प्रचंड उत्तेजन मिळाले. ज्यामुळे प्रत्येक मोठय़ा राजकीय आंदोलनामध्ये मुंबईची प्रमुख भूमिका होती. सन १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांची पुढे लोकसंख्येमध्ये भर पडली. २० व्या शतकाच्या मध्यानंतर, मुंबई आणि बाहेरील भागांमध्येही उंच इमारतीच्या स्वरुपामध्ये वाढ होत गेली, त्यामुळे उत्तरीय उपनगरे आणि भूखंडामध्ये जलद विस्तार होत गेला. आज, शहराची लोकसंख्या अंदाजे १४ दशलक्ष इतकी आहे.
मुंबई तथ्य फाइल
"तीन शतके पूर्वी, मुंबई सात लहान दलदलीचा द्वीपे संग्रह होता"
"मुंबईतील लोकसंख्या अंदाजे 14 दशलक्ष आज अंदाज आहे"
"मुंबई हे बेट त्यांच्या विवाहाचा हुंडा म्हणून इग्लंडचे राजे चार्ल्स दुसरा पोर्तुगीजांनी भेट होते"
"मुंबई उपनगरीय रेल्वे व्यवस्था 2.2 अब्ज प्रवासी दरवर्षी एकूण वाहून"
"जून 2003 च्या जून 2003 च्या मुंबई महानगर क्षेत्रातील एक अविश्वसनीय 982 गावे आहेत, मुंबई महानगर क्षेत्रातील एक अविश्वसनीय 982 गावे आहेत"
मुंबई आधारित पुस्तके अनेक आढळू शकते येथे
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६
|