मायबीएमसी बिल्डिंग आयडी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यांतर्फे नागरिकांना आणि व्यावसायिक संस्था यांना इमारती व मालमत्ता यांचे संबंधित अनेक प्रकारच्या सेवा आणि परवानगी दिल्या जातात. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील इमारत प्रस्ताव खाते, करनिर्धारण व संकलन खाते,आरोग्य खाते,दुकाने व आस्थापना खाते, अनुज्ञापन खाते, अग्निशमन खाते, घन कचरा व्यवस्थापन खाते आणि अशी विविध खाती इमारती किंवा अचल मालमत्ता यांच्या संदर्भातील विविध परवानग्या तसेच अभिलेख निर्माण करतात. तसेच नागरिक त्या संदर्भात मालमत्तेचा कर भरणे, जल जोडणी शुल्क किंवा जलदेयक भरणे,एखाद्या अनुज्ञापत्राचे नुतनिकरण करणे वा अर्ज करणे, ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे,एखादी नागरी तक्रार करणे किंवा इमारतीच्या परिसरातील झाडांची छाटणी करणे इत्यादी सेवा उपभोगत असतात.या विविध सेवा देत असताना विविध खाती स्वतंत्र अभिलेख निर्माण करुन त्या खात्याचा विशिष्ठ क्रमांकाने तो संदर्भित करतात.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील दोन लाख तीस हजार इमारती करनिर्धारण व संकलन खात्याने करनिर्धारित केल्या आहेत.प्रत्येक इमारत कर संकलनाकरिता 15 अंकी लेखा क्रमांकाने अंकित करण्यात आलेली आहे. या पैकी दिड लाख इमारती या डिजीटल नकाश्यावर नोंदवण्यात आलेल्या आहेत.

सदर 15 अंकी लेखा क्रमांक हा त्या इमारतीचा महानगरपालिकेच्या विविध अभिलेखातील विशिष्ठ एकमेव ओळख क्रमांक असेल व मायबीएमसी बिल्डिंग आयडी च्या माध्यमातून सदर 15 अंकी ओळख क्रमांक विविध विभागाद्वारे वापरण्यात येणा-या विविध संदर्भ जसे की, जलजोडणी क्रमांक (CCN),परवाना क्रमांक, इमारत आराखडा मंजूरी क्रमांक इत्यादींशी एकत्रितपणे जोडले जाईल.

इमारतींचा मायबीएमसी बिल्डिंग आयडी संदर्भित करुन विविध विभागांमार्फत संगणकीय प्रणाली द्वारे दिल्या जाणा-या सेवा/कागदपत्रे प्राप्त करुन होणे सुकर होईल.विविध विभागातील इमारती संदर्भातील दस्तऐवज त्या इमारतीच्या मायबीएमसी बिल्डिंग आयडी शी संलग्न करण्याची प्रक्रिया विभागातील कर्मचा-यांमार्फत निरंतरपणे होणार असून त्यातून मायबीएमसी बिल्डिंग आयडी हे माध्यम अधिक समृद्ध होईल.आजमितीस प्रथम टप्प्यात नागरिक त्यांची इमारत /मालमत्ता डिजिटल नकाशावर शोधून त्यांचे मायबीएमसी बिल्डिंग आयडी स्टिकर डाउनलोड करुन त्याच्याशी परिचित होण्यासाठी इमारतीवर चिकटवू शकतील.कालांतराने सदर एकमेव मायबीएमसी बिल्डिंग आयडी हा बृहन्मुंबई महानगर पालिकेशी व्यवहारांकरिता महत्वाचा ठरणार आहे.

अधिक जाणून घ्या कमी जाणून घ्या मायबीएमसी बिल्डिंग आयडी ऍप्लिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

नागरिकांसाठी

   

बीएमसी कर्मच्याऱ्यांसाठी