उद्यान विभाग हे बृ.मुं.म.न.पा.चे एक असे प्रशासकिय खाते आहे की, जे अग्निशमन दल, परिरक्षण, आरोग्य, अभियांत्रिकी खाते, इ. सारख्या अन्य तांत्रिक खात्यांकडून सल्ला घेवून सल्लामसलतीने विविध परवाने देतात. हे लक्षात घेता वृक्ष तोडणे/छाटणे, यासारखे कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी उद्यान खात्याकडून आस्थापनांनी आवश्यक परवानगी घेणे अत्यावश्यक आहे साफ आंगण योजनेअंतर्गत उद्यानाचे सौंदर्यीकरण, धार्मिक परवानगी, सामाजिक परवानगी, राजकीय परवानगी, निवडणूक परवानगी, चित्रिकरण परवानगी, मैदानांमध्ये खेळांचे आयोजन करण्याकरिता परवानगी हे या प्रवर्गाअंतर्गत येतात.

महानगरपलिका उद्याने आणि खेळाची मैदाने या प्रवर्गाकरिता देण्यात येणा-या परवान्याकरिता अर्ज:
1.धार्मिक परवानगी जोडपत्र
2.सामाजिक परवानगी जोडपत्र
3.राजकीय परवानगी जोडपत्र
4.निवडणुक परवानगी जोडपत्र
5.चित्रिकरण परवानगी जोडपत्र
6.खेळांची परवानगी  
7.पदपथांचे सौंदर्यीकरण- “साफ आंगण” परवाना जोडपत्र
8.“साफ आंगण” परवान्याचे नुतनीकरण जोडपत्र
9.वृक्ष/वृक्षाच्या फांद्या छाटण्यासाठी परवानगी जोडपत्र

संमति देणारे प्राधिकारीउद्यान सहाय्यक/सहाय्यक अभियंता,परिरक्षण, सौंदर्यीकरण आणि नुतनीकरण करण्याकरिता परवानगी वृक्ष तोडण्याकरिता – सहाय्यक उद्यान अधिक्षक आणि उद्यान अधिक्षक यांची परवानगी आवश्यक
कार्यवाही कालावधी अन्य सर्व अर्जांकरिता आवश्यक कागदपत्रांसहित योग्य अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून सात दिवस(प्रति छाननी पातळी)
अर्ज छाननी पातळीधार्मिक/सामजिक/राजकीय/निवडणूक/चित्रिकरण/खेळ -परवानगीकरिता एक पातळी
अन्य सर्व अर्जांकरिता दोन पातळया

लागू असलेले शुल्क
नवीन परवाना अर्ज सादर करतेवेळी देय छाननी/परवाना शुल्क
सक्षम प्राधिका-याने अर्जाची संमति दिल्यानंतर देय अनुसूची शुल्क


अर्ज कार्यवाहीबाबत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न खाजगी प्रायोजकांना दत्तक / काळजीवाहू तत्वावर देण्यात आलेल्या उद्याने / मैदाने / मनोरंजन मैदाने इत्यादी विषयी माहिती *अर्ज लवकरच उपलब्ध होतील. सध्या अर्ज नागरी सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत.
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६