५३ एकरात पसरलेल्या २७० पेक्षा अधिक प्राणी, सरपटणारे प्राणी, जलचर प्राणी, पक्षी तसेच अपवादात्मक आणि दुर्मिळ वनस्पतिवृत्तांची विस्तृत विविधता असलेल्या, स्वच्छ, सुंदर आणि अभ्यागतांसाठी अनुकूल अशा या प्राणिसंग्रहालयाचा समृद्ध वारसा पुढे चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ६४ अंतर्गत उद्याने, जपानी, मियावाकी, रोझ गार्डन इत्यादीसह आपल्या गजबजलेल्या मेगा सिटी-मुंबईच्या अगदी मध्यभागी हे सर्व वैभव अत्यंत कमी आणि स्वस्त दरात आहे, जेणेकरून जास्तीत जास्त मुले आणि लोकांना याचा शैक्षणिक आणि अनुभवात्मक दृष्टीकोनातून फायदा होईल.
सर्वांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ प्रदर्शनी प्रदान करण्यासाठी तसेच वैज्ञानिक अभ्यास आणि विश्लेषणावर आधारित प्राणीसंग्रहालय विकसित करुन देखभाल करण्यासाठी, आमचे कर्मचारी, अभिरक्षक, जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय डॉक्टर, पशुपालक, माळी, सुरक्षा कर्मचारी आणि देखभाल संघांनी अथक प्रयत्न केले आहेत. येथील प्राणी आणि पक्षी आम्हा सर्वांसाठी आपल्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आहेत.
मुंबई प्राणिसंग्रहालय म्हणून परिचित असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात आम्ही आपले स्वागत करतो. आपल्या जवळच्या लोकांसह आम्हाला भेट द्या, अर्थातच कोविड योग्य वर्तनाचे अनुसरण करा.