बृ.मुं.म.न.पा.च्या संकेतस्थळामध्ये स्वागत.
बृ.मुं.म.न.पा.च्या विविध खात्यामध्ये पारदर्शकता आणि सुरळीत सहकार्य यावे या उद्देशाने बृ.मुं.म.न.पा.ने नागरिकांच्या फायद्याकरिता ई-गव्हर्नन्सचा स्वीकार केला असून या नागरी संकेतस्थळामार्फत अत्यआवशक सेवा देण्यात आल्या आहेत. हे संकेतस्थळ शहराच्या प्रत्येक बाबींबाबत माहिती, त्यांची कार्यपध्दती आणि जन्म/मृत्यु दाखला, तक्रारींची नोंदणी, इ. यासारख्या नागरी सेवा माहिती देते
प्राथमिकपणे ज्या सेवाना कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही अशा सेवा या संकेतस्थळावर देण्यात येतील, अन्य सेवा त्यायोगे नंतर दिल्या जातील.
या संकेत स्थळावर दुकाने व आस्थापना खात्यांतर्गत नोंदणीकरण नुतनीकरण व नोंदणीप्रमाणपत्रातील बदल नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. आस्थापनेच्या मालकांना ऑनलाईन पीद्धतीने कामगारांचे हजेरीपत्रक, रजापत्रक व वेतनपत्रक अपलोड करण्याकरिता सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे
याशिवाय उपरोल्लेखित सेवामध्ये दुकाने व आस्थापना नोंदणी, कलम 394, 313, 328अ अन्वये व्यवसाय परवाने, कलम 394, 412 आणि मअभेप्र (महाराष्ट्र अन्न भेसळ प्रतिबंध) परवाना कारखाने परवानगी, इ. करिता अर्ज करणे नागरिकांकरिता लवकरच शक्य होईल.