आरोग्य खाते हे बृ.मुं.म.न.पा. चे एक प्रशासकिय खाते असून जन्म/मृत्यु नोंदणी करुन जन्म/मृत्यु दाखला देण्याची जबाबदारी या खात्यावर असते. हे खाते बृ.मुं.म.न.पा. चे परवाना अग्निशमन दल, आरोग्य, अभियांत्रिकी , मालमत्ता इ. सारख्या अन्य तांत्रिक सल्लागार खात्यांकडून सल्ला घेवून परवाने देतात. हे लक्षात घेता कोणत्याही वस्तूचे उत्पादन, साठा किंवा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी आरोग्य खात्याकडून आस्थापनांनी आवश्यक परवाने घेणे अत्यावश्यक आहे. भोजनालय, उपहार गृह, औषधे उत्पादन, वैद्यकिय दुकाने, आणि दुध आणि दुधाचे पदार्थ विकणे, मसाला, सोडावॉटर पेये, बर्फाचे कारखाने, इ. सहित वस्तू/कोणतेही व्यवसाय या परवाना प्रवर्गाअंतर्गत येतात.
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६