1. १. अर्ज कोठे करावा?
बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या जवळील कोणत्साही नागरी सुविधा केंद्रास (सीएफसी) भेट द्या
बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या जवळील कोणत्साही नागरी सुविधा केंद्रास (सीएफसी) भेट द्या
अर्जदाराने अर्जाचा नमुना संपूर्ण भरून त्यावर आपली स्वाक्षरी करुन आवश्यक त्या कागदपत्रे आणि शुल्कासहित नागरी सुविधा केंद्रात जाऊन सादर करणे आवश्यक आहे. हा अर्ज लवकरच या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
अर्जाची पुढील कार्यवाही संबंधित विभागाचे इमारत व कारखाना खात्याच्या प्रमुखांमार्फत केली जाते. ठिकाणाची पाहणी आणि मंजुरी देणा-या प्रधिका-याकडून अर्ज संमत झाल्यानंतर अर्जदारास आवश्यक परवाना दिला जातो.
जवळील नागरी सुविधा केंद्रास भेट द्या किंवा तुमच्या अर्जाचा तपास लावण्याकरिता ऑनलाईन सुविधेचा वापर करुन नागरी संकेतस्थळावरील “स्थिती तपासा” या लिंकमध्ये जाऊन तपासा. ही सुविधा वापरत असताना अर्ज क्र.(यास ट्रांझेक्शन आय डी देखील म्हणतात.) आवश्यकता असते.